BANNER

The Janshakti News

सांगलीत, मनोरूग्ण विघ्नसंतोषी असणाऱ्या चंद्रकांत पाटील विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक... ..चंद्रकांत पाटील याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन.. ..बेताल वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी...




=====================================
=====================================

सांगली | दि. १० डिसेंबर २०२२

सध्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या बाबतीत वाचाळ, बदनामी कारक बोलले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य केले होते त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेत तीव्र असंतोष आहे. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण येथे एका आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबतीत अतिशय वादग्रस्त वक्तव्य करून महापुरुषांचा अवमान केला आहे.


महापुरुषांनी भीक मागून शाळा चालवली अस वक्तव्य केले आहे त्यामुळे महाराष्ट्र सहित संपुर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. मुळात महापुरुषांचा अपमान करणे हेच देशद्रोह करण्यासारखे आहे तरी बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीर चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.


यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे,सांगली शहर अध्यक्ष शिवाजी तथा पवन वाघमारे नाझिर हुसेन झारी, संजय कांबळे, किरणराज कांबळे, विकास कांबळे, अर्जुन कांबळे,राजू मुलाणी, चंद्रकांत सरवदे, राहुल कांबळे, विजय मोरे, यशोधन सनदी, शिलसागर धम्मकिर्ती ,नितीन माने, प्रकाश कांबळे, रणजित माने,राजु मोरे, अमितकुमार कांबळे, गौतम लोटे, प्रमोद वराळे, प्रशांत वाघमारे, मिलिंद कांबळे, अतिश कांबळे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆