BANNER

The Janshakti News

सेकंडरी स्कूलचे वरिष्ठ लिपिक प्रशांत भास्कर तथा बापू जोशी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
=====================================
=====================================

भिलवडी | दि. १० डिसेंबर २०२२

 भिलवडी (ता.पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक प्रशांतबापू जोशी हे शासकीय नियमानुसार व नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त दि. 31आक्टोंबर रोजी झाले. त्या निमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने मा. अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एस. एल माने, पर्यवेक्षिका सौ. राजकुमारी यादव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, चांदीची मुर्ती, पोशाख, व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

सुरुवातीला संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सौ. आर. झेड तांबोळी यांनी व  जी. बी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी प्रशांत बापू जोशी यांनी एक्कावन्न हजार रुपयांची संस्थेस देणगी दिली. 

यावेळी संस्थेचे संचालक डी. के किणीकर, संजय कदम, व्यंकोजी जाधव तसेच प्राचार्य दिपक देशपांडे,सुकुमार किणीकर, स्मिता माने,माजी संचालक आण्णा महादेव शेटे, शिवाजी माने गुरूजी , माजी मुख्याध्यापक बी. एन मगदूम, एस. एस भोकरे, सौ. शुभांगी मन्वाचार तसेच सेवानिवृत्त शिक्षक मोहन पाटील, शशिकांत उंडे व सर्व  शिक्षक शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार संजय कुलकर्णी यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆