BANNER

The Janshakti News

महापुरुषांच्या बाबतीत वाचाळ वक्तव्य करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी... वंचित बहुजन आघाडीची मागणी...
                                व्हिडीओ पहा
                                       ⏬


=====================================
=====================================

कवठेमहांकाळ | दि. ११ डिसेंबर २०२२

सध्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या बाबतीत वाचाळ, बदनामी कारक बोलले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य केले होते. त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेत तीव्र असंतोष आहे. 

त्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण येथे एका आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबतीत अतिशय वादग्रस्त वक्तव्य करून महापुरुषांचा अवमान केला आहे. 

 महापुरुषांनी भीक मागून शाळा चालवली अस वक्तव्य केले आहे त्यामुळे महाराष्ट्र सहित संपुर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. मुळात महापुरुषांचा अपमान करणे हेच देशद्रोह करण्यासारखे आहे. 

तरी बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीर  चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 


यावेळी वंचित बहुजन आघाडी कवठेमहांकाळ तालुका महासचिव विज्ञान लोंढे, सचिन वाघमारे, प्रथमेश बनसोडे, ऋषिकेश साबळे, आकाश भोसले आदी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆