BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा पहिला हफ्ता रु. ३,००० जाहीर..



=====================================
===================================== 

कुंडल | दि. 29 नोव्हेंबर 2022

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला पहिला हफ्ता रु. ३,००० देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुणअण्णा लाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते.


आमदार लाड म्हणाले, हा हंगाम सुरू होऊन ३१ दिवस झाले आत्तापर्यंत १ लाख ९४ हजार टन ऊसाचे गाळप झाले झाले आहे. यंदा कारखाण्याकडे 14 हजार हेक्टर ऊस नोंद आहे, यावरून 12 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. कारखान्याच्या आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढवून 90 हजार लिटर प्रति दिन क्षमतेने चालवणार आहोत. देखील आपण बँका, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक आणि कर्मचाऱ्यांची सर्व देणी वेळेत दिली आहेत. ईथुनपुढे अडचणीत असलेला सहकार सभासद, ऊस उत्पादक, कामगार, संचालक मंडळ, अधीकारी यांनी सर्वोतोपरी मदत केली तरच टिकू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदीतील जास्तीत जास्त ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

क्रांतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक ऊस विकास योजना आखल्या यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचावला आहे, शेतकऱ्यांनी अभ्यासू शेती केली तर उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ साधता येईल.कारखान्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहे, त्याचा फायदा शेतकऱ्याने घ्यावा असेही ते म्हणाले.

यावेळी संचालक  संपतराव सावंत, आत्माराम हारुगडे, अरुण कदम, जयप्रकाश साळुंखे, आप्पासाहेब जाधव, अंकुश यादव, जयवंत कुंभार, शीतल बिरनाळे, अलका पाटील, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆