BANNER

The Janshakti News

------------------------------------------------------- भिलवडी येथे विविध ठिकाणी संविधान दिन साजरा... संविधान दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले अभिवादन... ------------------------------------------------------- माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यासह 15 पैकी 12 सद्स्य संविधान दिनाला गैरहजर.. याबाबत एका माजी ग्रामपंचायत सद्स्याने निषेध व्यक्त केलेली सोशल मीडियावरची व्हायरल पोस्ट पहा... -------------------------------------------------------=====================================
=====================================

⏩व्हायरल पोस्ट ⏩माळवाडी चे दुर्देव म्हणजे ज्या संविधानाने लोक प्रतिनिधीना ग्रामपंचायतीत सदस्य म्हणुन मान मिळाला त्या सदस्यांना संविधान दिना निमित्त ग्रामपंचायतीत उपस्थित रहावे आसे वाटतं नाही हे दुर्देव, त्याचा निषेध करावा आसेहि वाटतं नाही,,, आज माळवाडी ग्रामपंचायतीत संविधान दिन साजरा करण्यात आला या वेळी सरपंच व श्री संपत सोनवले श्री शिवाजी गायकवाड व्यतिरीक्त सर्व बारा लोक प्रतिनिधी (ग्रा.पं.सदस्य ) ग्रामसेवक गैर हजर होते याच्या सारखं दुर्दैवी काही नाही, वार्डातील कामाशी यांचे काही देणेघेणे नाही, गावातील बहुतांशी लोकांना सदस्यांची नावेही आठवत नाहीत सगळ्यांनी नितिमत्ता गहाण ठेवली आहे असेच वातावरण आहे, परंतु ग्रामपंचायतीतील पैसा प्रत्येक महिन्यात खर्ची पडतो त्याबद्द्ल नेते लोकांचे आभार मानले पाहिजेत,,,,,..

धन्यवाद,, श्री. मनिष मोरे,, (माझी ग्रा.पं.सदस्य)


------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. 29 नोव्हेंबर 2022

भिलवडी (ता.पलूस) येथील विविध संस्था, प्रशासकीय कार्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.


यामध्ये दक्षिण भाग सोसायटी कार्यालयामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी,सभासद, सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.


भिलवडी ग्रामपंचायत येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच विद्या पाटील व उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या सह ग्रामपंचायतीचे  सद्स्य , ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी वर्ग  उपस्थितीत होते.पंचशील नगर येथील येथील बुद्ध विहारात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाज बांधवांनी महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहीक वाचन केले.

याप्रसंगी संमेश रांजणे , विजय कांबळे , कुंदन कुरणे , कुणाल रांजणे , पंकज गाडे , अनिकेत रांजणे , पार्थ कांबळे , प्रतीक रांजणे , विकास कुरणे , सिद्धार्थ कुरणे , अनमोल कांबळे , राहुल कुंदे , सूरज कांबळे , इंद्रजित कांबळे , संतोष गाडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन  प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . 
   
 
यावेळी प्राचार्य दीपक देशपांडे म्हणाले की,भारतीय संविधान हे जगाच्या तुलनेत अतिशय उत्कृष्ठ अशी शासन व्यवस्था , कायदा व्यवस्था . समान न्यायदान पध्दती आहे . भारतीय राज्यघटना लिहिताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी अनेक देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करून तयार केलेली आहे. ती चिरतरुण आहे. कोणीही सहज बदलावी अशी लवचिक नसून ती आदर्श राज्यघटना आहे यामध्ये भारतीय नागरिकांना समान हक्क आहेत. या राज्यघटनेच्या प्रत्येक कलमांतून छोट्या पासून मोठ्या व्यक्तिपर्यंतचा विचार केला आहे . ही राज्यघटना सर्वांना समान न्याय देणारी म्हणून सर्वश्रेष्ठ आहे असे ते म्हणाले .


यावेळी उपस्थितांना भारतीय संविधानाची शपथ देण्याचे काम डॉ. व्ही . एम. गाडे यांनी केले .

 स्वागत, प्रास्ताविक व मनोगत डॉ. व्ही.एस. विनोदकर यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. डॉ. कदम एस.डी. यांनी केले. यावेळी मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली . यावेळी या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रा. डॉ. एस.एस. पाटील यांनी  मानले .

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆