धक्कादायक घटना...
ब्रम्हनाळ येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या...
भिलवडी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद..
======================================
======================================
भिलवडी | दि.३० जुलै २०२२
ब्रम्हनाळ तालुका पलूस येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संडास जवळील चौकटीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ३० जुलै २०२२ रोजी उघडकीस आली आहे. याबाबत भिलवडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताय खंडू मदने वय 40 वर्षे रा. ब्रम्हनाळ ता. पलूस जि. सांगली यांने त्यांचे राहते घराचे पाठीमागील बाजूस असलेल्या संडास जवळील चौकटीला कोणत्यातरी अज्ञात कारणाने दोरीने स्वता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सदर घटनेची वर्दी विजय रघुनाथ सुतार वय 48 वर्ष रा.ब्रम्हनाळ ता.पलूस यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
भिलवडी पोलीस ठाण्यात अकस्मित मयत रजि नं. 18/2022 सी आर पी सी 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सा.पो. नि. कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. सुतार हे करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆