BANNER

The Janshakti News

सांगली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर...





सांगली  जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर...

=====================================

=====================================

सांगली | दि. २७ / ०७ / २०२२

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८ (१) (अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला, (अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण महिलासह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करुन त्याकरिता आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सांगली जिल्हा परिषदेसह सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या दहा पंचायत समितीच्या सभा गुरुवार दि.२८ /०७/ २०२२ रोजी  सकाळी ११:०० वाजता होणार असून  आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्याचा दिनांक २९ /०७/ २०२२  व आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी / संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी २९/ ०७ /२०२२ ते ०२ /०८/ २०२२ असा असणार आहे.

सांगली जिल्हा परिषदेची सभा - जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे होणार आहे.त्याचबरोबर
सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या १० पंचायत समितीचे सभेचे ठिकाण पुढील प्रमाणे असणार आहे. १) आटपाडी -  पंचायत समिती आटपाडी सभागृह २) जत -  तहसील कार्यालय आवारातील तलाठी भवन जत ३) खानापूर - बैठक कक्ष तिसरा मजला तहसील कार्यालय खानापूर विटा ४) कडेगाव - तहसील कार्यालय कडेगाव येथील सभागृह पहिला मजला ५) तासगाव - पंचायत समिती सभागृह तासगाव ६) कवठेमहांकाळ - तहसील कार्यालय कवठेमंकाळ तहसीलदार यांचे दालनात ७)  पलूस - तहसील कार्यालय पलूस सभागृह ८) वाळवा - तहसील कार्यालय वाळवा इस्लामपूर ९)  शिराळा - पंचायत समिती सभागृह शिराळा १० )  मिरज - पंचायत समिती मिरज येथील सभागृह..


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆