BANNER

The Janshakti News

भिलवडी सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..
=====================================


=====================================

भिलवडी | दि. २५ जुलै २०२२

भिलवडी ता.पलूस येथील सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थनी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते.प्रारंभी दिवंगताना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव डी.आर.कदम यांनी मांडला.कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात वाचनालयाच्या विविध उपक्रमांची विस्ताराने माहिती दिली व मागील सभेचे इतिवृत्त सादर केले.
जयंत केळकर यांनी जमाखर्च पत्रके व अंदाजपत्रके सादर केली.त्यास सभेने मान्यता दिली.यानंतर अभ्यासिकेची काम प्रभावीपणे करण्याचे सर्वानुमते ठरले.वाचन कट्टा उपक्रम दर महिना नियमित घेण्याचे ठरले.महापुराच्या पार्श्वभमीवर पहिला मजला बांधण्याचे नियोजन करण्या विषयी चर्चा झाली.या सभेत इयत्ता १० वी,१२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्ष गिरीश चितळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपाध्यक्ष चिंतामणी जोग,विश्वस्त रघुनाथ देसाई,डॉ.भालचंद्र कुलकर्णी,
जी.जी.पाटील, डॉ.जयकुमार चोपडे,कार्यकारणी सदस्य व सभासद उपस्थित होते.अशोक साठे यांनी आभार मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆