BANNER

The Janshakti News

औदुंबर व भिलवडीला जिल्हा अधिकारी मंताडा राजा दयानिधी यांची भेट... संभाव्य पूर परिस्थितीचा घेतला आढावा...



======================================


======================================

भिलवडी | दि.०१ ऑगस्ट २०२२

 पलूस तालुक्यातील  औदुंबर व भिलवडी येथे दिनांक 31 जुलै रोजी सांगली जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मंताडा राजा दयानिधी यांनी भेट दिली व सांभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा आधिकारी यांनी औदुंबर ते भिलवडी येथील साखरवाडी पाणवठ्या पर्यंत बोटीतून प्रवास  करुन धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते  तीर्थक्षेत्र औदुंबर येथील दत्ताची महाआरती करण्यात आली. 


यावेळी अंकलखोप गावाच्या वतीने देवस्थान कमिटीने शाल , श्रीफळ , गुलाबपुष्प व दत्ताची प्रतिमा देऊन त्यांचे  स्वागत केले. त्यानंतर त्यांनी  भिलवडी येथील नदीवरील पुलाची पाहणी केली. त्यानंतर मौलाना नगर व वसंतदादा नगर या भागाची ही पाहणी करून तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.व संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तालुका प्रशासन व स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या. 


यावेळी पलूस कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड , पलूसचे तहसीलदार निवास ढाणे ,अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते , जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी नदाफ , पाटपंधारेचे अधिकारी ,  तलाठी गौसमोहम्मद लांडगे , भिलवडीच्या सर्कल जाधव मॅडम यांच्या सह आदि पदाधिकारी उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆