BANNER

The Janshakti News

अनिल दादा जगताप यांची बीड शहरात दमदार एन्ट्री ...अनिल दादा जगताप  यांची बीड शहरात दमदार एन्ट्री ...

-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------

बिड | दि. 17 / 03 / 2022

बीड जिल्हा प्रतिनिधी - श्री बाळराजे जाधव

गेल्या चार महिन्यापासून शिवसेना बीड जिल्हा पद रिक्त असल्यामुळे रिक्त असलेल्या पदी वर्णी लावण्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेकांनी या ठिकाणी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला मात्र यश आले नाही  परंतु शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बीड जिल्ह्याचे ढाण्या वाघ असलेले तसेच त्यांच्या मागील उत्कृष्ट कामाची पोचपावती म्हणून परत एकदा दमदार असलेले धडाकेबाज व्यक्तिमत्व  बीड जिल्हा शिवसेना जिल्हा  अध्यक्षपदी मा श्री  अनिल दादा  जगताप यांची परत एकदा बीड जिल्हा शिवसेना जिल्हा अध्यक्ष पदी  निवड केल्याबद्दल  बीड जिल्ह्यात बीड शहरांमधून तसेच महाराष्ट्र राज्य मधून राज्याच्या कानाकोपऱ्यात मधून  अनिल दादा जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव  होत आहे त्यांची बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच बीड शहरात आले असता त्यांचे सर्वच  ठिकाणी  आनंदाच्या उत्सवामध्ये स्वागत करण्यात आले.


 यामुळे बीड  शहर  शिवसेनेच्या जयघोषाने दुमदुमले होते तर  या निमित्ताने बर्‍याच कालानंतर शिवसेनेचे वातावरण पुन्हा  एकदा बीड शहरात पाहावयास मिळाले म्हणून याप्रसंगी शिवसेना जिल्हा अध्यक्ष मा श्री अनिल दादा जगताप साहेब  यांचा  बीड येथे  यथोचित सत्कार करताना  पेठ बीड  शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विभाग प्रमुख सौ शारदाताई विजेन्‍द्र सिंह डुलगच ताई सह उपस्थित असलेले अखिल भारतीय बाल्मीकि समाजाचे महाराष्ट्र राज्य मुंबई प्रदेश चे प्रदेशाध्यक्ष मा श्री विजेन्‍द्र सिंह  भाऊ डूलगच साहेब तसेच उपस्थित शिवसेनेचे बीड तालुका प्रमुख मा. श्री. उल्लास  गिराम पाटील  तसेच मा. श्री. अरुण‌ जी  हटवाल सह येथे उपस्थित असलेले संजय देवा  कुलकर्णी कुकडगावकर  तसेच यावेळी विविध क्षेत्रातील  मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆