BANNER

The Janshakti News

खटाव ता.पलूस येथे जागतिक महिला दिनानिमित्त 15 वा वित्त आयोग उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मसाला उद्योग निर्मिती प्रशिक्षण व रांगोळी स्पर्धा..



खटाव ता.पलूस येथे जागतिक महिला दिनानिमित्त 15 वा वित्त आयोग उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मसाला उद्योग निर्मिती प्रशिक्षण व रांगोळी स्पर्धा...

--------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------

भिलवडी | ता. १७ मार्च २०२२

खटाव ता.पलूस येथे दि.१६ मार्च रोजी आर.के.फाऊंडेशन व ग्रामपंचायत खटाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 15 वा वित्त आयोग उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मसाला उद्योग निर्मिती प्रशिक्षण व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
खटाव येथील महिलांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी खटाव ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक व नागरीकांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर.के. फाउंडेशनच्या उपाध्यक्षा पुनम शामराव बुचडे या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन पूनम बुचडे यांच्या हस्ते करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना पूनम बुचडे म्हणाल्या की महिलांनी पुढे येऊन लहान मोठे उद्योग सुरू केले पाहीजेत.या नंतर कोणते प्रशिक्षण हवे असतील तर संस्था  नेहमी मदत करेल.
तसेच मा.श्री.आकाश बुचडे म्हणाले महिलांनी स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे.महिला कोणत्याही मोठ्या उद्योग क्षेत्रात काम करू शकतात. फक्त महिलांनी मनापासून ढरविले पाहिजे. एस. एंटरप्राइजेस प्रायव्हेट.लिमिटेड च्या  माध्यमातून महिलांसाठी ग्लोबल प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू.
महिलांच्यासाठी हा उपक्रम राबविल्या बद्दल व त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ग्रामपंचायत खटाव तर्फे आर.के फाउंडेशनचे मा.श्री.आकाश शामराव बुचडे यांचा गौरव पत्र व गौरवचिन्ह  देऊन गौरव करण्यात आला.सर्व कार्यक्रम इको फ्रेंडली साजरा केला.झाडे लावा झाडे जगवा अभियान अंतर्गत संस्थे तर्फे वृक्ष वाटप करण्यात आले.
यावेळी खटाव गावचे हितचिंतक मा.श्री ओंकार पाटील , ग्रामविकास अधिकारी घाडगे  , सरपंच सौ.निलावती गुरव ,उपसरपंच पाटील ,ग्रामपंचायत सदस्या आशाताई कांबळे,मनोजकुमार कांबळे , आर.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश बुचडे,प्रथमेश दाभाडे,प्रकाश मोरे,पूनम पारसे.  ग्राम संघाच्या अध्यक्षा मा.सौ.गीतांजली पाटील  खटाव गावातील महिला उपस्थित होत्या.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆