BANNER

The Janshakti News

रणसंग्राम आयोजित महिला दिनास कुंडल येथील महिला भगिनींचा तुफानी प्रतिसाद... कुंडलच्या हेंद्रे कुटुंबातील जावा भगिनींसह पाच महिला पैठणीच्या मानकरी... लावणी सम्राज्ञी चैत्रालीच्या ठेक्यावर कुंडलच्या 70 वर्षीय आज्जीने धरला ठेका... हजारो महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद... रविवार आठवडी बाजारचा महिलांना पडला विसर....! तीन तासाचा कार्यक्रम तब्बल पाच तास रंगला...!रणसंग्राम आयोजित महिला दिनास कुंडल येथील महिला भगिनींचा तुफानी प्रतिसाद...

कुंडलच्या हेंद्रे कुटुंबातील  जावा भगिनींसह  पाच महिला पैठणीच्या मानकरी...

लावणी सम्राज्ञी चैत्रालीच्या ठेक्यावर कुंडलच्या 70 वर्षीय आज्जीने धरला ठेका... हजारो महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद...


 रविवार आठवडी बाजारचा महिलांना पडला विसर....! तीन  तासाचा कार्यक्रम तब्बल पाच तास रंगला...!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

-------------------------------------------------------------------


-------------------------------------------------------------------


कुंडल | ता. १६ मार्च २०२२

                    रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल ॲड. दिपक दादा लाड मित्र परिवार यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित नितीन गवळी भाऊजींच्या होम मिनिस्टर खेळामध्ये  पाच भाग्यवान महिलांना पैठणी साडी सहित, इतर विजेता महिलांना पाच सिल्क साडीसह आकर्षक बक्षिसांची खैरात महिलांसाठी यानिमित्ताने करण्यात आली... 

                      यामध्ये प्रमुख आकर्षण ठरलेली मुंबई वरुन आलेली लावणी नृत्यांगना चैत्राली पानसरे हिने तर सत्तरीतील महिलांना लावणीचा  ठेका धरायला लावला...  
लावणी सम्राज्ञी चैत्राली यांच्या लावणीवर कुंडल येथील महिलांनी ठेका धरत वन्स मोअर घेतला, चैत्राली यांनी उपस्थित महिलांच्या गर्दीमध्ये मध्ये जाऊन सादर केलेल्या लावणीने कुंडलकर महिलांची मने जिंकत वाहवा मिळवली..डॉ साधना पवार, डॉ कामत मॅडम, ॲड क्रांती पाटील, शुभांगी ताई पाटील सुरेखाताई जाधव रणरागिनी सोशल फाउंडेशन च्या सर्व महिलांच्या सहित कुंडलच्या महिलांनी मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला.. 

           महिलाच्या जिवनात एक दिवस निखळ आनंदाचा सोबतीला मनोरंजना बरोबरच आकर्षक बक्षिसे देऊन महिलांमध्ये आत्मविश्वास,धाडस, आणि अंगभुत कलेला वाव मिळावा यासाठी रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल कडून दरवर्षीच महिलादिनी अनोखे आयोजन केले जाते,

यावर्षीच्या अभिनव सांस्कृतिक उपक्रमास महीलांनी भरभरून प्रतिसाद दिला सुमारे २ हजार महिलांनी कार्यक्रमला उपस्थिती दर्शवली...

तीन तासाचा चालणारा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम हा तब्बल पाच तास झाले ..
तरी संपला नाही यावरून महिलांनी कार्यक्रमास महिलांनी दिलेला भरभरून प्रतिसाद लक्षात येतो.


 प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील खळखळते हास्य ,महिलांना मिळालेले मुक्त व्यासपीठ संसाराच्या गाड्यातून थोडावेळ मनाला मिळालेला विसावा,

यामुळे महिला भगिनींना 
कार्यक्रम संपला तरी घरी जाण्याचा ,रविवारच्या बाजारचा विसर पडला होता..

पुढील कित्येक दिवस या कार्यक्रमामुळे आमच्यामध्ये चैतन्य राहील.. धकाधकीच्या जीवनात आजचा निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम पुढील काही महिने आमच्या लक्षात राहणार आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित सर्व महिलांनी दिली..


रणसंग्राम सोशल फाउंडेशन महिला टीम फाउंडेशन च्या सर्व सदस्यांचे कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल अगदी मनस्वी कौतुक करत महिलांनी पुन्हा पुन्हा आभार मानले..

कुंडल येथील हेंद्रे कुटुंबातील दोन सख्या जावा भगिनींचे कौतुक

कुंडल येथील डॉ सौ आयुश्री वैभव हेंद्रे, सौ अनुश्री विश्राम हेंद्रे या दोन सख्ख्या जावा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा मानकरी बनल्या.. एकाच कुटुंबात मानाच्या पैठणी आणि त्याही सख्ख्या जावा पैठणीच्या मानकरी बनल्या,
हा कुंडलमध्ये कौतुकाचा विषय बनला.. 
कुंडलकर महिलांच्या कडून दोघी जावा भगिनींनी वाहवा मिळवली..


यासोबत कुंडलच्या श्रीमती आशाताई तुकाराम आवटे, सौ नंदा रमेश मैत्रे, आष्टा येथील कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू , रणरागिनी महिला सोशल फाउंडेशनच्या क्रियाशील सदस्य सौ. राणीताई गुरव या तिघींसह कुंडल येथील हेंद्रे कुटुंबातील दोन जावा भगिनींच्या सह एकूण पाच महिलांना पैठणीचा  मानकरी बनण्याचा बहुमान मिळाला..

यावेळी कुंडल येथील महिला भगिनींसाठी अण्णासाहेब डांगे वैद्यकीय महाविद्यालय यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते.


खेळ पैठणीचा यासाठी विजेत्या महिलांना कराडहून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौ. सीमा लाड भोसले यांनी मानाच्या पैठणी दिल्या होत्या..

कार्यक्रमासाठी डॉ राजन कामत, डॉ साधना पवार, ॲड क्रांती पाटील,डॉ कामत मॅडम,डॉ विजय माला चौगुले,सुरेखा ताई जाधव, सौ शुभांगी भिसे, सौ सोनल गायकवाड,संदीप कुडचीकर ,पोपटराव सूर्यवंशी, रामचंद्र चव्हाण गुरुजी,निवास सावत ,मेघमाला लाड, शिवाजी रावळ,श्याम माने, अविनाश मोहिते,शुभांगी पाटील, बाबुराव शिंदे, सुरज महाराज सोळवंडे, संग्राम थोरबोले, पत्रकार प्रमोद जाधव, हनीफ शेख, कुमार जवीर ,तानाजी राजे जाधव, सह कुंडल सह जिल्हाभरातून अनेक मान्यवर व  महिला आवर्जून उपस्थित होत्या..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆