BANNER

The Janshakti News

बातमी का छापली नाही म्हणून पत्रकार नाना गडदे यांना मारहाण... पत्रकार संरक्षण कायद्यान्वये जत येथे माजी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल...
बातमी का छापली नाही म्हणून पत्रकार नाना गडदे यांना मारहाण...

पत्रकार संरक्षण कायद्यान्वये जत येथे माजी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल...

======================================


======================================

जत | ता. १६ मार्च २०२२

जत तालुक्यातील बाज येथील दैनिक तरुण भारतचे पत्रकार नाना बाबू गडदे यांना आमची बातमी का छापली नाही म्हणून ऊस, काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत भ्याड हल्ला करण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी बाज येथे घडला. याप्रकरणी पोलिसात बाजचे माजी सरपंच व आणि दोन गाव गुंड तसेच अनोळखी 7 जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की बाज येथील माजी सरपंच संजय आनंदा गडदे यांनी 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाची बातमी त्यांनी पत्रकार नाना गडदे यांना देण्यास सांगितली होती. गडदे यांनी त्यांनी पाठवलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर या कार्यक्रमाची सविस्तर कच्ची माहिती द्या, मी लगेच बातमी देतो असे सांगितले. त्यानंतर गडदे यांनी पत्रकार नाना गडदे यांना माहिती दिली नाही उलट त्यांच्यावर काहीही कारण नसताना रोष ठेवून मंगळवारी सकाळी बाज गावातील प्रमुख चौकात त्यांना मारहाण करण्यात आली. नाना गडदे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन पेपर वाचण्यासाठी चौकात थांबले होते. त्याच वेळी संशयित आरोपी संजय आनंदा गडदे, अशोक बिरु गडदे, सदाशिव उर्फ विकास बंडगर या तिघांसह चार जणांनी नाना गडदे यांना ऊस, काट्या, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.


या घटनेनंतर पत्रकार नाना गडदे यांनी ही माहिती जत येथील पत्रकारांना दिली.तातडीने गडदे जत येथे आल्यानंतर जत येथील सर्वच पत्रकारांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, यांना भेटून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीवर कलम 143, 147,149, 324,506 या कलमाखाली गुन्हा दाखल केलाआहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले करत आहेत.

आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ,
या आरोपींनी पत्रकार गडदे यांना मारहाण केली आहे, ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर जत व कवठेमंकाळ पोलिसात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय गावा दहशत करणे, गुंडगिरी करणे असे प्रकार सतत होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच जत येथील सर्व पत्रकार दिवसभर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. पत्रकारावर अशा प्रकारे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला.
आरोपीवर कठोर शासन व्हावे,त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय नाना गडदे यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 यावेळी पत्रकार दिनराज वाघमारे, मारुती मदने,किरण जाधव,सोमनींग कोळी, विठ्ठल ऐनापुरे, हरी शेटे,संजय गुरव, बादल सर्जे, विजय रुपनूर,भागवत काटकर, सुधाकर जाधव, अमोल कुलकर्णी,गोपाळ पाथरूट, राहुल संकपाळ ,अमर कोळी, महादेव कांबळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆