BANNER

The Janshakti News

रयत शेतकरी संघटनेच्या आंदोलनास यश... यापुढे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा आम्ही राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन करु... सुनील ठोसर



रयत शेतकरी संघटनेच्या आंदोलनास यश...

यापुढे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा आम्ही राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन करु... सुनील ठोसर

=====================================
=====================================

बिड | दि. 17 / 03 / 2022

बिड जिल्हा प्रतिनिधी - श्री. बाळराजे जाधव

रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिन्यापासून सुरू असलेले शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या  विजे संदर्भातील आंदोलनास अखेर यश मिळाले. 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन राज्य सरकारच्या आदेशानुसार महावितरणा कडून तोडण्यात आले होते. सदरच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभर रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आंदोलने करण्यात आली. सदर आंदोलनास यश आले असून महाराष्ट्रातील सर्व शेती पंपाचे वीज कनेक्शन जोडण्याचे व पुढील तीन महिने वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु यापुढे
भविष्यामध्ये  सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा  निर्णय घेतला तर आम्ही परत राज्यभर रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून  तीव्र आंदोलन करू.. असे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी जनशक्ती न्यूज च्या बिड जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆