BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या , सेकंडरी स्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न...भिलवडी शिक्षण संस्थेच्या , 
सेकंडरी स्कूल  मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न...

-------------------------------------------------------


-------------------------------------------------------

भिलवडी | ता. १८ / ०३ / २०२२

भिलवडी (ता.पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल मध्ये सन १९७३-७४ जुनी ११ वी. एस. एस.सी. वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संस्थेच्या बाबासाहेब चितळे सभागृहात संपन्न झाला.
भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जे.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला. ४८ वर्षानंतर विद्यार्थी सवंगडी एकत्रित आल्याने आनंददायक वातावरण होते.उपस्थितांनी विद्यार्थी दशेतील विविध आठवणींना उजाळा देत शाळा,संस्था व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली . सर्व माजी विद्यार्थ्यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस ५१ हजार रुपयांची देणगी दिली.भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,सचिव मानसिंग हाके यांनी या देणगीचा  स्विकार केला.या बॅचला शिकविणारे शिक्षक जे. ए.पाटील, सी.के.जोग, बी. डी.वाळवेकर,जे. बी.चौगुले,एस. बी.वाळवेकर, एच.आर.जोशी,शिक्षेत्तर कर्मचारी जे.के.केळकर,के.जी.
मोरे,एम.बी.जंगम,जी.के.सूर्यवंशी 
आदींचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला.


यावेळी बोलताना डॉ.बाळासाहेब चोपडे म्हणाले की,भिलवडी शिक्षण संस्था अनेकांच्या  योगदानातून,संस्था पदाधिकारी व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या परिश्रमातून उभारली आहे.संस्थेचा सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढविण्याचे काम केले आहे.
भिलवडी शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील नावलौकिक प्राप्त संस्था असून कार्यरत असणारे संचालक मंडळ दातृत्ववान असल्याचे प्रतिपादन जे. ए.पाटील यांनी व्यक्त केले. 
सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतच असतात पण शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थी संस्कारक्षम बनत असतात असे विचार सी.के. जोग यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
शिक्षकांच्या संस्कारामुळे आम्ही विद्यार्थी घडलो,कित्येकांना विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे मनोगत हाकिम तांबोळी यांनी व्यक्त केले.


माजी विद्यार्थी व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर, डॉ.जयकुमार चोपडे,निवृत्त न्यायाधीश जगन्नाथ माळी,प्रकाश कुंभोजकर यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याचे संयोजन केले.
उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा मान्यवर पाहुणे व गुरुजनांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत डी.के. किणीकर यांनी केले,पाहुण्यांचा परिचय डॉ.जयकुमार चोपडे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा.शिवाजी कुकडे यांनी केले तर जगन्नाथ माळी यांनी आभार मानले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆