BANNER

The Janshakti News

रयत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी महादेव येवले यांची निवड.रयत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी महादेव येवले यांची निवड.... 

=====================================


=====================================

बिड | दि. 18 / 03 / 2022

बिड जिल्हा प्रतिनिधी - बाळराजे जाधव

माजलगाव तालुक्यातील जायकोचीवाडी येथील महादेव संभाजी येवले यांची रयत शेतकरी संघटनेच्या बिड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
   महादेव येवले यांचा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग आहे.  गोरगरीब जनतेची व शेतकऱ्यांच्या हिताची कामे  मार्गी लावण्यासाठी ते सतत  प्रयत्न करीत असतात.
 त्यांची ही धडपड पाहाता रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर यांनी महादेव येवले यांच्याकडे रयत शेतकरी संघटनेचे बिड जिल्हाध्यक्ष पदाचा  पदभार सोपवण्यात आला आहे. 


   
सुनील भाऊ ठोसर  यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते महादेव संभाजी येवले यांची बिड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनील ठोसर यांच्या हस्ते  निवड पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी  रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲड.रवि प्रकाश  देशमुख , राजेश्वर मोरे रयत शेतकरी संघटना तालुका प्रमुख . किशोर बोबडे , राम शेजुळ , कैलास सुराशे यादींनी महादेव येवले यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆