BANNER

The Janshakti News

औदुंबर व माळवाडी येथे " महाराष्ट्र नवनिर्माण सेना " शाखा उद्घाटन संपन्न....औदुंबर व माळवाडी येथे " महाराष्ट्र नवनिर्माण सेना " शाखा उद्घाटन संपन्न....

-----------------------------------------------------------------
        सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.
------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. ३१/०१/२०२२

 पलुस तालुक्यातील औदुंबर व माळवाडी  या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत(फायटर साहेब) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रम प्रसंगी औदुंबर व्यापारी संघटना सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  औदुंबर शाखाध्यक्ष पदी स्वानंद पिसे व शाखा उपाध्यक्षपदी राहुल काटू तर माळवाडी शाखाध्यक्ष पदी विष्णू सुपनेकर व शाखा उपाध्यक्ष पदी विलास परशुराम शिंदे यांना जबाबदारी देण्यात आली‌. 


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव ,कृषी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील, दिलीप निकम, विभाग अध्यक्ष रोहित भोकरे ,योगेश भागवत , वैभव येसुगडे, रणजीत मुळीक आदी उपस्थित होते. 
  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लागण्यापूर्वी लवकरच आम्ही "  गाव तिथे शाखा " हा उपक्रम हाती घेणार असल्याचे रोहित भोकरे यांनी सांगितले..

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆