BANNER

The Janshakti News

खंडोबाचीवाडी येथे आमदार अरुण (आण्णा) लाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही व खाऊचे वाटप...खंडोबाचीवाडी येथे आमदार अरुण (आण्णा) लाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही व खाऊचे वाटप...

भिलवडी | दि. 30/10/2021

खंडोबाचीवाडी ता.पलूस येथे पदवीधर आमदार मा. अरुण लाड यांच्या वाढदिवसानिमित्त खंडोबाचीवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व तालुका वरिष्ठ कार्यकारणी सदस्य  मा. सुदाम बाबर (सर) यांच्या वतीने खंडोबाचीवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. 


सदर कार्यक्रमाचे आयोजन  खंडोबाचीवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यानी केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा. मोहन पाटील (सर) , राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा  युवती सचिव सौ.स्मिता यादव , युवा नेते विशाल शिंदे , ऍड. अभिषेक खोत , अनिल जाधव , हनमंत शिंदे , अक्षय पवार , निखिल शिंदे , प्रदीप मगदूम सह  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व खंडोबाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर , मोटकट्टे मॅडम  व शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.