BANNER

The Janshakti News

पलूस : सावंतपूर वसाहती मधील जि.प.प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय " दिपोत्सव " केला साजरा...



पलूस : सावंतपूर वसाहती मधील जि.प.प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय " दिपोत्सव " केला साजरा...

पलूस | दि. ३०/१०/२०२१

पलूस : जिल्हा परिषद शाळा सावंतपुर वसाहत शाळेत प्रत्येक वर्षी  दिपावली निमित्त मोठ्या उत्साहाने " दीपोत्सव " साजरा करण्यात येतो.  कोरोनाच्या काळात हा दीपोत्सव सोहळा रद्द करण्यात आला होता त्यामुळे यावर्षीच्या दीपोत्सव सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. 


इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थी नव-नवीन कपडे घालून नटून-थटून आपल्या पालकांसह मोठ्या उत्साहाने या दीपोत्सव सोहळ्यासाठी आले होते. प्रत्येकाने सुंदर आकाश कंदील तयार केले होते. 


 इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी " तेजाची दुनिया " हे दिवाळीचे गीत हातामध्ये पणत्या व मेणबत्ती घेऊन मोठ्या उत्साहाने साजरे केले.  या संपूर्ण दीपोत्सव सोहळ्याचे अगदी शिस्तबद्ध नियोजन श्री. धनंजय साळुंखे सर व सर्व शिक्षकांनी केले. 


यावेळी शाळेचा परिसर स्वच्छ करून  सुंदर  रांगोळ्या  काढण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी नव-नवीन कपडे घालून चार-पाच दिवसात येणाऱ्या दिवाळीच्या सनाचे उत्साहात  स्वागत केले. 


याप्रसंगी मुख्याध्यापक बिना माने यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सणाची माहिती देऊन कोरोनाच्या अनुशंगाने घ्यावयाची काळजी व शासन नियमांचे  पालन करण्याच्या  सूचना दिल्या.त्याचबरोबर पुष्पा राजे याने विद्यार्थ्यांना दिवाळीच्या चार दिवसांचे महत्त्व पटवून सांगितले. 


याप्रसंगी सुधा सुतार , सुवर्णा सावंत , मीनाक्षी सुतार , सीमा नलवडे , मेघा हनमाने , या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिता बुर्ले  यांनी केले तर  आभार प्रदर्शन सुधा सुतार यांनी मानले. यावेळी शाळा व्यवस्थापनचे सदस्य व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनीच या  या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.