सांगली, दि.8 ,(जि.मा.का.) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.05 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून मोटारीने आष्टा, ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा येथे आगमन व डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचे प्रकाशन व शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचा उद्घाटन सोहळा. दुपारी 12.50 वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


