yuva MAharashtra विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा सांगली जिल्हा दौरा

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा सांगली जिल्हा दौरा



 

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : महाराष्ट्र  विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे रविवार दिनांक 9  ऑगस्ट 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.55 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने आष्टा ता. वाळवा जि.सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या  91 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा व त्यांच्या जीवनकार्यावर आधारित आम्रवृक्ष आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच शैक्षणिक संकुलातील विविध शाखांसाठी नव्याने उभारलेल्या इमारतींच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 2 वाजता आष्टा ता. वाळवा येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.



  🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰