yuva MAharashtra भिलवडीत ‘सरगम सुवर्ण महोत्सव’ची पर्वणी ; सोने-चांदी खरेदीवर लकी ड्रॉ बक्षीस वितरण सोहळा आज

भिलवडीत ‘सरगम सुवर्ण महोत्सव’ची पर्वणी ; सोने-चांदी खरेदीवर लकी ड्रॉ बक्षीस वितरण सोहळा आज



भिलवडी दि. ३० : भिलवडी ता. पलूस येथील सरगम ज्वेलर्स यांच्या वतीने अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'सरगम सुवर्ण महोत्सवा' अंतर्गत सोने-चांदी खरेदीवरील लकी ड्रॉ योजनेचा बक्षीस वितरण सोहळा आज (दि. ३० जून) सायंकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे.

हा कार्यक्रम पाटील डेअरी मल्टीपर्पज हॉल, माळवाडी (भिलवडी) येथे आयोजित करण्यात आला असून, यावेळी महाराष्ट्राची लोकप्रिय 'लोकधारा' भव्य सांस्कृतिक नृत्याविष्कार हे विशेष आकर्षण असणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. भक्ती मकरंद चितळे (उद्योगिका, चितळे उद्योग समूह) उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रतीक संग्राम पाटील (सदस्य, जिल्हा परिषद, सांगली) तसेच मा. श्री. रमेश महादेव पाटील (संस्थापक, व्यापारी संघटना, भिलवडी) उपस्थित राहणार आहेत.

लकी ड्रॉमधील भाग्यवान विजेत्यांना इलेक्ट्रिक टू-व्हीलर, फ्रिज, वॉशिंग मशीन, ३२ इंच एलईडी टीव्ही, पीठाची गिरणी आणि वॉटर प्युरिफायर यांसारखी आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच उपस्थित सर्व कूपनधारकांसाठी आकर्षक भेटवस्तू व भोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. जगदीश माळी आणि सरगम परिवार, भिलवडी यांनी केले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰