yuva MAharashtra वही, खाऊ आणि शिक्षणाला प्रोत्साहन ; साम्राज्य ग्रुप फाऊंडेशनचा आदर्श उपक्रम

वही, खाऊ आणि शिक्षणाला प्रोत्साहन ; साम्राज्य ग्रुप फाऊंडेशनचा आदर्श उपक्रम



भिलवडी दि. 25 : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा एक स्तुत्य उपक्रम माळवाडी, ता. पलूस येथे राबविण्यात आला.

मा. सिद्धार्थ खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन भारत यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. 

वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत त्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

कार्यक्रमाचे आयोजन साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते.


   यावेळी मा. सिद्धार्थ खंडागळे यांच्यासह अभिजीत देसाई, राज शेख, आकाश मोहिते, ओमकार माने, फिरोज मुल्ला, शहीद सुतार, आदित्य शिंगटे, भावेश शिंगटे तसेच साम्राज्य ग्रुप फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनीही उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.


साम्राज्य ग्रुप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात शाळेच्या परिसरात लॉन विकसित करणे तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवश्यक साहित्य संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी सिद्धार्थ खंडागळे यांनी दिले.


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि समाजहितासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰