yuva MAharashtra कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी



 

सांगली, दि. ३ (जि. मा. का.) : कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11 व 49 मधील तरतुदीनुसार गुरुवार, दिनांक 04 जून 2026 रोजीच्या 00 वाजलेपासून ते रविवार दिनांक 07 जून 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या व बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांचे पाणी उपसा बंदी करण्यात येत असल्याचा उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी निर्गमित केला आहे.  

 

या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांव्यतिरीक्त इतर कारणासाठी (खाजगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करुन बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी/औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करु नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेवून पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे, आदेशात म्हटले आहे.

 

दरम्यान, सोमवार, दिनांक 08 जून 2026 रोजीच्या 00 वाजलेपासून ते गुरूवार दिनांक 11 जून 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत उपसा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰