कोल्हापूर दी. २७ : Confederation of Indian Industry, Chitale Dairy आणि D. Y. Patil Group यांच्या संयुक्त विद्यमाने तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील D.Y. Patil Agriculture & Technical University मध्ये शनिवार, ३० मे रोजी “अॅग्री इनोव्हेशन समिट २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी, दुग्ध व्यवसाय, अॅग्री प्रोसेसिंग, ग्रामीण विकास आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा समिट पार पडणार आहे.
‘व्हिजन २०४७’ अंतर्गत भारताची पाच ट्रिलियन आणि महाराष्ट्राची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्यात दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे योगदान कसे वाढवता येईल, यावर या परिषदेत विशेष चर्चा होणार आहे. कृषी आधारित उद्योग, मूल्यवर्धित प्रक्रिया, निर्यातक्षम शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण भागातील उद्योजकतेच्या संधींवर तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.
परिषदेत महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक Ashok Kakade, Vilas Shinde, Girish Chitale, Virendra Patil, Dr. Sanjay Patil, Dr. Anilkumar Gupta, Abasaheb Kale, C. Vasanthkumar, Chetan Narke, Pratik Patil आणि Dr. Virat Giri यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच Prashant Mandke, Vishwas Chavan, Mahavir Chougule, Atul Babar, Divakar Bedkar आणि Malhar Bhandurge यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.
या समिटमुळे उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांच्यात समन्वय व संवाद वाढण्यास मदत होणार असून कृषी क्षेत्रासाठी दीर्घकालीन नेटवर्क निर्माण करण्याचा सीआयआयचा मानस आहे. शेती आणि पूरक व्यवसायांमध्ये नवकल्पना, तंत्रज्ञान व उद्योगसंधी निर्माण करण्यासाठी हा समिट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या परिषदेस सीआयआय सदस्यांसह कृषी, दुग्ध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



