सांगली, दि. 16 (जि. मा. का) : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार, दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.25 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळ येथून सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.25 वाजता सांगली येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – मिरज हायस्कूल, मिरज. दुपारी 1 वाजता सिध्दार्थ बंगला, विजयनगर सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता सिध्दार्थ बंगला येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता श्री. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सांगली-मिरज रोड, मिरजकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता श्री. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे आगमन व ऑल इंडीया जर्नालिस्ट असोशिएशन (डिजीटल मीडिया) राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थिती, स्थळ – संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सांगली-मिरज रोड, मिरज. दुपारी 3.45 वाजता सरस्वतीनगर, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता श्री. गणेश गाडगीळ यांच्या निवासस्थानी भेट, स्थळ – सरस्वतीनगर, सांगली. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. सायंकाळी 6.45 वाजता सांगलीहून मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



