yuva MAharashtra अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबईदि.4 : राज्यात परवानाधारक खासगी आणि अवैध असे दोन प्रकारचे  सावकार आहेत. अवैध सावकारांनी दिलेली सर्व कर्जे बेकायदेशीर असून अशा प्रकरणांत नागरिकांनी धैर्याने तक्रार करावीशासन त्यांच्या पाठीशी उभे राहीलअसे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

विधान परिषदेत सदस्य मिलिंद नार्वेकरभाई जगतापशशिकांत शिंदे यांनी खासगी सावकार आणि मायक्रो फायनान्स संदर्भातील प्रश्न विचारला असतामुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीपरवानाधारक सावकारांनी देखील नियमबाह्य पद्धतीनेठरलेल्या व्याजदरापेक्षा जास्त वसुली केली किंवा दामदुपटीच्या नियमांचे उल्लंघन केलेतर त्यांच्यावरही कारवाई होईल. संबंधितांना पूर्ण दिलासा देण्यात येईल आणि गरज पडल्यास सावकारीचा परवाना रद्द करून फौजदारी कारवाई केली जाईल,असेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.  या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी करण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰