yuva MAharashtra पलुस शहरात धनश्री पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

पलुस शहरात धनश्री पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न




पलूस, दि. १९ मार्च २०२६ : पलूस शहरात नव्याने स्थापन झालेल्या 'धनश्री पतसंस्था' या सहकारी संस्थेचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. सहकार क्षेत्रातील या नव्या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसराच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना यावेळी नागरीकांडून व्यक्त करण्यात आली.


या सोहळ्याचे उद्घाटन चितळे उद्योग समूहाचे संचालक मा. गिरीश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास संस्थापक व चेअरमन दत्तात्रय बागल यांच्यासह तज्ञ संचालक ॲड. विशाल कुंभार व ॲड. अभिषेक खोत यांच्यासह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


कार्यक्रमास परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.


यावेळी बोलताना चेअरमन श्री. दत्तात्रय बागल यांनी सांगितले की, धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना आर्थिक सहाय्य, विविध बचत योजना, ठेवी योजना तसेच सुलभ व पारदर्शक कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


उद्घाटन प्रसंगी ॲड. अभिषेक खोत यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, पतसंस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून त्या माध्यमातून लघुउद्योजक, शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना मोठा आधार मिळतो. धनश्री पतसंस्था ही विश्वासार्ह, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा देणारी संस्था म्हणून लवकरच ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण पलूस तालुका असल्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी “सहकार, प्रगती आणि समृद्धी” या ध्येयवाक्याला अनुसरून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. या पतसंस्थेमुळे परिसरातील आर्थिक व्यवहारांना गती मिळून स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास संस्थेचे तज्ञ संचालक ॲड. विशाल कुंभार यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाचे नियोजन सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील प्रगतीबाबत सकारात्मक चर्चा रंगली.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰






🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰