सांगली दि. 20 (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) ही दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर 2025 ते 13 फेब्रुवारी 2026 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ दिली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
ज्या शाळांनी अद्याप अर्ज सादर केले नसतील त्यांनी २८ फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.



