yuva MAharashtra प्राणी छळ प्रतिबंध कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

प्राणी छळ प्रतिबंध कायद्याचे पालन करण्याचे आवाहन



        सांगली दि. 31 ( जि.मा.का.) :  मायाक्का चिंचणी (कर्नाटक) येथे होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्राणी छळ प्रतिबंध कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

            प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, मायाक्का चिंचणी (कर्नाटक) येथे होणाऱ्या यात्रेमध्ये जाणारे भाविक रात्रीच्या वेळेस घोडागाडीच्या शर्यती घेत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून निदर्शनात येत आहे. हा प्रकार प्राणी छळ प्रतिबंध कायद्याचा भंग आहे. प्राणी छळ प्रतिबंध कायदा कलम 38 च्या पोट कलम 1 आणि 2 च्या नियमानुसार सूर्यास्त नंतर कोणत्याही प्राण्यास पायी चालवणे, झुंपणे, शर्यत घेणे, वापर करणे कायद्याने बंदी आहे. जर असा प्रकार कोणी केला तर संबंधित व्यक्तीवर प्राणी छळ प्रतिबंध कायदा 1960 कलम 11, मुंबई पोलीस अधिनियम 119 व रस्ते सुरक्षितशी संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल व प्राणी जप्त करण्यात येतील,  असे जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती मार्फत प्रसिद्धीपत्रकाव्दारे  कळविण्यात आले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰