कोल्हापूर दि. १६ : भारतीय सैन्य दलाच्या १०९ इन्फंट्री बटालीयन
( टीए ) मराठा लाईट इन्फंट्रीच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी मुख्यालय दक्षिणमहाराष्ट्र व गोवा
उपक्षेत्राच्या वतीने सांगली,कोल्हापूर,सातारा ,
सिंधुदुर्ग व रत्नागीरी जिल्हयातील माजीसैनिक
वीरनारी व वीर मातांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजनकेल्याचीमाहीती निवृत्त जिल्हासैनिक कल्याणअधिकारी लेप्ट.कर्नल डॉ . भिमसेन
चवदार यांनी दिली .
हा मेळावा १०९ इन्फंट्री बटालीयन (TA ) द
मराठा इन्फंट्री प्रशिक्षण क्षेत्र कोल्हापूर येथे दि . २७ सप्टेंबररोजी सकाळी ७ वाजता पासून
सुरु होईल . मेळाव्यातील उपस्थीतांसाठी नाष्टा
अल्पोपहार , दुपारचे भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून विविध ठिकाणांहून
कार्यक्रम स्थळापर्यंत येणेजाणे साठी व्यवस्था
करण्यात आली आहे .
प्रमुख वैशिष्ट्ये
पेन्शन / स्पर्श सहाय्य डेस्क, वैद्यकीय शिबीर ,
चौकशी सहाय्य,कल्याण व तक्रारनिवारण महसूल ,पोलिस मदत डेस्क/ सहकार्यकर्त्यांशी संवाद असे मेळाव्याचे स्वरुप आहे .
१०९ इन्फंट्री बटालियन (TA) द मराठा लाईट इन्फंट्री, कोल्हापूर, मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्राच्या वतीने संयोजन केले आहे.
सांगली,सातारा,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागीरी
जिल्हयातील माजीसैनिक, वीरमाता, वीरनारी
यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थीत राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन
संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे .
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




