वारणा धरणात 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 103.95 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.05 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.88 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.02 (34.40), राधानगरी 8.17 (8.36), दूधगंगा 21.43 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.65 (2.77), पाटगांव 3.69 (3.72), अलमट्टी 122.48 (123).
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 2100, धोम 505, कण्हेर 40, धोम बलकवडी 330, वारणा 1630, दुधगंगा 300, तुळशी 50, हिप्परगी बॅरेज 24 हजार 802 व अलमट्टी धरणातून 25 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 12 (40) व अंकली पूल हरिपूर 9.2 (45.11).
जिल्ह्यात सरासरी 6.9 मि.मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 6.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 17.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 17.1 (377.3), जत 5.5 (385.5), खानापूर 10.8 (342.6), वाळवा 1.6 (500.7), तासगाव 11.5 (403.2), शिराळा 0.0 (1172.7), आटपाडी 2.9 (394.5), कवठेमहांकाळ 11.1 (389), पलूस 1.5 (442.6), कडेगाव 1.1 (357.5).
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


