yuva MAharashtra स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त भिलवडीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन..

स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त भिलवडीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन..




भिलवडी (प्रतिनिधी) दि. १६ : सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व भिलवडी परिसरातील लोकप्रिय नेते स्वर्गीय संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने भिलवडी ग्रामपंचायत व सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी हनुमान मंदिर भिलवडी येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 आज सकाळी युवा नेते प्रतीक संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते  स्वर्गीय संग्राम दादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.



 याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे , सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बि.डी. पाटील , मा. सरपंच राहुल कांबळे , मा. सरपंच शहाजी गुरव , मा. सरपंच धनंजय पाटील , मा. उपसरपंच बाळासाहेब मोरे, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे , तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते ,  महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ऐनुद्दीन उर्फ चयु जमादार , ग्रामपंचायतचे मा. सदस्य चंद्रकांत पाटील , विद्यमान सदस्य प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे  ( दत्तनगर, भिलवडी ) सनी यादव, अब्बूबखर फकीर , रशिद मुल्ला यांच्यासह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



या शिबिरामध्ये नामांकित हृदयरोग तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, ईसीजी, रक्तदाब तपासणी, सल्लामसलत यासह आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. 

सदर चे शिबीर आज दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मारुती मंदिर भिलवडी या ठिकाणी होत असून भिलवडी व परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्याकडून करण्यात आले आहे.




स्व. संग्राम दादा पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प या शिबिरातून करण्यात येत आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰