yuva MAharashtra स्व. संग्राम (दादा) पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार ; माजी खासदार राजू शेट्टी यांना स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा पुरस्काराने गौरवण्यात येणार...

स्व. संग्राम (दादा) पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार ; माजी खासदार राजू शेट्टी यांना स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा पुरस्काराने गौरवण्यात येणार...



भिलवडी (प्रतिनिधी) :- सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे लोकप्रिय नेते स्व. संग्राम (दादा) पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

स्व.संग्राम दादा यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबिर , वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, आदी सामाजिक उपक्रम राबबिण्यात येणार आहेत. 

  

 शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत मैदान भिलवडी येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:००  वाजेपर्यंत हनुमान मंदिर भिलवडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून  रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता यल्लमा मंदिर परिसर येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच पाटील गल्ली भिलवडी येथील निवासस्थानी सकाळी ९:०० वाजता प्रतिमा पूजन , ९:३० ते ११:३० या दरम्यान भजन , आकरा ते दोन स्मृती भोजन आणि दुपारी १:०० वाजता अभिवादन सभा असे उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


                     स्व. संग्राम (दादा) पाटील

स्व. संग्राम (दादा) पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या नियोजन संदर्भात विचार विनीमय करण्यासाठी स्व. संग्राम दादा पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील व पुतणे  पृथ्वीराज पाटील  ( भिलवडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच ) यांच्या प्रमुख उपस्थितीत काल गुरुवार दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी मारुती मंदिर भिलवडी येथे बैठक संपन्न झाली.


यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे , सांगली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बी डी पाटील , भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शहाजी गुरव , माजी सरपंच राहुल कांबळे , माजी उपसरपंच मोहन तावदर , माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे , सदस्य चंद्रकांत पाटील , माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास अण्णा पाटील , महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ऐनुद्दीन उर्फ चयु जमादार , मुसा शेख त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

   यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमां अंतर्गत रक्तदान शिबिर , वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप यासह  माजी खासदार राजू शेट्टी यांना स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच


  अभिवादन सभा  व " स्मृती सेवा गौरव पुरस्कार " या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार मोहनराव कदम भूषवणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार विशाल पाटील व आमदार डॉ. विश्वजित कदम हे उपस्थित राहणार आहेत.

  

 तसेच विशेष उपस्थिती म्हणून माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील , रयत शिक्षण संस्था उपाध्यक्ष महेंद्र लाड , आमदार अरुण लाड , आमदार सत्यजित देशमुख , चितळे उद्योग समुहाचे संचालक विश्वास चितळे  यांच्या सह आदी मान्यवर  कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे देखील सुभाष कवडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


         मा. खासदार राजू शेट्टी 

 या कार्यक्रमात कर्जमाफी, हमीभाव, स्वामिनाथन् समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतीमालाची आयात-निर्यात आदी मुद्यांना वाचा फोडणारे व दूध आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले शेतकऱ्यांचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना स्व. संग्राम (दादा) पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्व नेते मंडळी, विवध पक्ष, संघटनातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰