विज्ञान विषयाच्या शिक्षकानेच कृषीशास्त्राचा अभ्यासक्रम घ्यावा, असे वित्त खात्याचे म्हणणे आहे. परंतु असे होता कामा नये. विज्ञान विषयाचा शिक्षक हा कृषी विषयाचे शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकवू शकेलच असे नाही. शिवाय आज आपल्या महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने बी. एस. सी. ऍग्रीचे पदवीधर आहेत, ज्यांना अद्याप नोकरी मिळाली नाही. सुशिक्षित बेरोजगारांच्या यादीत असणाऱ्या अशांसाठी यनिमित्ताने रोजगार निर्मिती होईल. आणि म्हणून शालेय शिक्षणात कृषी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरु करण्यात यावा तसेच हा अभ्यासक्रम घेण्यासाठी बी. एस. सी. ऍग्रीची पदवी घेतलेला शिक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी यावेळी आमदार अरुण लाड यांनी केली.
2 वर्षांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी २५ एप्रिल २०२३ रोजी हा प्रस्ताव तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिलेला. त्यावेळच्या शिक्षणमंत्र्यांनी तो स्वीकारला होता. त्यानंतर लगेच अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून कृषी अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.मात्र त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद गरजेची असल्याने वित्त विभागाची मंजुरी गरजेची आहे. मात्र नवे शिक्षक नेमण्यापेक्षा सध्या कार्यरत विज्ञान शिक्षकाकडूनच कृषी विषयाचेही अध्यापन करवून घ्यावे, असे मत वित्त विभागाने नोंदविले असल्याने आमदार अरुण लाड यांनी सभागृहाचे लक्ष वेधत सरकारदरबारी ही मागणी केली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰