VIDEO
पलूस दि. 10 : पलूस आणि कुंडल नगरीचा अनमोल हिरा भारतीय सेनादलातील कमी वयातील लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना वीरमरण आले आज त्यांच्या आजोळी कुंडल (ता. पलूस) येथे क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड रणसंग्राम सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अभिवादन शोकसभा आयोजित केली होती.यावेळी शोकसभेत बोलताना रणसंग्राम चे अध्यक्ष दिपक लाड म्हणाले कुंडल भूमीचा रत्न शहीद लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या रूपाने हरपला, नव्या पिढीला त्यांच्या विचारांचा व कर्तुत्वाचा आदर्श प्रेरक ठरेल यासाठी त्यांचे स्मारक होणे गरजेचे असल्याचे अभिवादन सभेत बोलताना ॲड. दीपक लाड यांनी व्यक्त केले.
यावेळी किरण तात्या लाड म्हणाले शहीद लेफ्टनंट अथर्व हा कुंडलच्या आमच्या लेकीचा हा बाळ अत्यंत कर्तृत्ववान होता, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आमच्या कुंडल च्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरवशाली वारसा नेटाने पुढे नेणारा तो लेफ्टनंट होता. त्यांच्या अकाली जाण्याने कुंडलचे खूप मोठे नुकसान झाले आहे , यावेळी बोलताना बाळासाहेब बापू पवार म्हणाले देशपातळीवरील लष्करातील सर्वोच्च पदावर कमी वयातील लेफ्टनंट अथर्व कुंभार यांच्या जाण्याने कुंडल पलूस सह सांगली जिल्ह्याचे वैभव गेले, भविष्यातील एका कर्तुत्वान विंकमांडरला आपण कुंडलकर मुकलो अशी भावनिक श्रद्धांजली बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केली.
श्रीकांत नाना लाड म्हणाले लेफ्टनंट अथर्व कुंभार म्हणजे सर्वांच्या आशेचा किरण होता. लेफ्टनंट अथर्व यांच अकाली जाणं कुंडल आणि पलूस चे दुर्दैव या दोन्ही गावावर मोठा दुःखाचा आघात आहे अशी भावना श्रीकांत नाना लाड यांनी व्यक्त केली.
यावेळी सर्जेराव पवार, पलूसचे अभियंता बी आर जाधव,जगदीश दादा पाटील कुंडलिक नाना एडके,मेजर हिम्मत होवाळ, मेजर अस्लम मुल्ला, प्रकाश भोरे सर पट्टणशेट्टी मॅडम, कुंडल चे मेजर रामचंद्र लाड ,यांनी अभिवादन श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले.
प्रशांत दादा पवार , सचिन दादा लाड,बाबासाहेब पवार, प्रतिनिधी हायस्कूलचे नितीन जाधव सर ,कुंडलचे सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच किरण भाऊ लाड, राजेंद्र भाऊ लाड,वैभव लाड सर,सर्जेराव खरात सर, जयवंत नाना आवटे ,सारंग माने, निवास भाऊ सावत, बाळासाहेब शिंदे,अरुण लाड, मेजर भगवान पवार, मेजर भगवान डूबल, मेजर कृष्णात आवटे,सुनील गुरव, मधुकर कुंभार, सुभाष कुंभार ,अमोल कुंभार, पवन कुंभार, सुहास कुंभार, राहुल पवार ,राहुल लाड, विशाल कोंढाळकर ,महादेव यल्लाटे, दिलीप वरुडे ,विष्णुपंत रोकडे, मनीषा लाड, सूगंधा एडके, रेशमा टेके यांच्यासह प्रतिनिधी हायस्कूल चे विद्यार्थी व कुंडल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अभिवादन सभेस उपस्थित होते. सूत्रसंचालन निवेदक शिवाजीराव रावळ यांनी केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰