भिलवडी दि. ०९ : महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे उद्योग समूह , चितळे उद्योग समूहाचे आधारवड सौ. पद्मजा चितळे ( वय ८६ ) यांचे ०९ जुलै रोजी पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
मे. बी. जी. चितळे उद्योग समूह भिलवडी स्टेशनचे संस्थापक, भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीचे माजी अध्यक्ष परशुराम ऊर्फ नानासाहेब चितळे यांच्या पत्नी व भिलवडी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक विश्वास चितळे यांच्या त्या मातोश्री होत.
एकंदरीत चितळे कुटूंबातील सौ. पद्मजा चितळे ह्या सर्वांना सोबत घेऊन चालणार्या, मन मिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने भिलवडी व परिसरात शोककळा पसरली आहे.
०९ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता त्यांचेवर कृष्णा घाट भिलवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰