VIDEO
सांगली दि. ०३ : सामाजिक न्याय विभागा मार्फत दलित अधिवासी यांच्या योजनेवर राज्य सरकार प्रत्येक वर्षी अर्थ संकल्पामध्ये निधीची तरतूद करुन. प्रत्येक वर्षी दलित मागासवर्गीय आणि अधिवासी यांच्या योजनेच्या व विकास कामासाठी खर्च केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये हा निधी इतर योजनांकडे वळवून दलित मागासवर्गीय व अधिवासी यांचेवर फार मोठा अन्याय केलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी हा गेल्या दोन वर्षामध्ये 14 हजार कोटी रुपये हा लाडकी बहिण योजनेकडे व इतरत्र वर्ग केला आहे. तो निधी तो निधी तात्काळ सामाजिक न्याय विभागाकडे तात्काळ देण्यात यावा व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा या व अन्य मागणीसाठी डेमोक्रेटिक पार्टी आॕफ इंडिया ( डि पी आय) पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 08/07/2025 रोजी दुपारी 3.00 वाजता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. यांची नोंद शासन व प्रशासन यंत्रणेने घ्यावी. आशा आशेयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी अशोकराव वायदंडे राज्य प्रवक्ते , सतिश लोंढे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र डि पी आय , संदिप काटे जिल्हा उपाध्यक्ष , अनिल सुवासे तासगाव तालुका नेते , अभय सकटे युवक अध्यक्ष तासगांव तालुका डि पी आय यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰