yuva MAharashtra साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळा कडून थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची फसवणूक... महामंडळ कार्यालयावर डेमोक्रेटिक पार्टी आॕफ इंडिया पक्षाच्या वतीने टाळा ठोक आंदोलन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळा कडून थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची फसवणूक... महामंडळ कार्यालयावर डेमोक्रेटिक पार्टी आॕफ इंडिया पक्षाच्या वतीने टाळा ठोक आंदोलन



                             VIDEO


       सांगली दि. ०3  :    साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा कडून थेट कर्ज योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून ५ लाख रुपये कर्ज स्वरुपात देण्यात येणार आहे. मातंग समाजातील व तत्सम जातीतील तरुण युवकाना रोजगार उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 
   या योजनेतून ४० लाभार्थ्यांना लाॕटरी पध्दतीने मंजूर करण्यात आली आहे. यातील १४ लाभार्थ्यांना या योजनेची पूर्तता करुन महामंडळाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु गेली ६ महिने झाले. लाभार्थी व जामीनदार यांच्या प्राॕपटीवर महामंडळाचा ५ लाख रुपयेचा बोजा चढविण्यात आला आहे. परंतु आज तागायत त्याना कर्जाची रक्कम मिळाली नाही.
   वारंवार सांगली येथील महामंडळ कार्यालयाकडे हेलपाटे मारुन सुध्दा महामंडळ व्यवस्थापक सातत्याने उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. मुंबई येथील महामंडळातील प्रकल्प अधिकारी व फायनान्स अधिकारी जाणीवपूर्वक उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांचेवर कारवाई करण्यात यावी. व लाभार्थी याना त्यांची कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी.



        या मागणीसाठी सांगली येथील अण्णा भाऊ साठे महामंडळ कार्यालयाला कुलूप ठोकून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. सदर महामंडळाची तातडीने चौकशी करावी या मागणीसाठी दिनांक ०८/०७/२०२५ रोजी सांगली येथील महामंडळ कार्यालयावर डेमोक्रेटिक पार्टी आॕफ इंडिया पक्षाच्या वतीने टाळा ठोक आंदोलन करण्यात येणार आहे याची शासन व प्रशासन यंत्रणेने नोंद घ्यावी.आशा आशेयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
  यावेळी अशोकराव वायदंडे राज्य प्रवक्ते , सतिश लोंढे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र डि पी आय यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

◾ YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

◾ News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰