सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : तासगाव तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता, शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ तासगाव येथे काढण्यात येणार आहे. या महत्वाच्या प्रक्रियेसाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तासगाव तहसिलदार अतुल पाटोळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
ही सोडत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाची अधिसूचना तसेच जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडील आदेश, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम 30 (4) (5) आणि मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 अंतर्गत पार पडणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडतीनंतर लगेच प्रवर्ग निहाय महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तहसिलदार तासगाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰