VIDEO
सांगली दि. ११ : सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील बदली कर्मचारी हे जवळपास २० ते २५ वर्षांपासून शासकीय नियुक्ती आदेशानुसार काम करत आहेत. त्याचा पगार हा शासनाच्या कोषागार कार्यालया मार्फत केला जातोय मात्र त्यांना तुम्ही कंत्राटी बदली कामगार आहात म्हणून सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता या सर्व कामगारांच्या नावाने भविष्य निर्वाह निधी हा नियमानुसार सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने भरणे बंधनकारक असताना ही त्यांची अंमलबजावणी केली नाही. कर्मचाऱ्यांचा ई. पी.एफ. व ई. एस. आय.सी. जमा होत नाही या कर्मचाऱ्यांना कंत्राटी कामगार म्हणून सांगितले जाते असे असेल तर गेल्या १५ ते २० वर्षापासून या कर्मचाऱ्यांचा ठेकेदार कोण आहे हे सांगितले तर जातच नाही. याउलट या सर्व बदली कर्मचाऱ्यांची सर्वबाजूंनी पिळवणूक केली जात आहे.
काही चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे शासकीय वयोमर्यादा पूर्ण केल्याने सेवानिवृत्त झाले आहेत संबंधित सर्व बदली कामगार आपले संपूर्ण आयुष्य रूग्णालयात एकनिष्ठेने रुग्ण सेवा करून आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करत राहिले होते प्रामाणिकपणे अनेक वर्ष सेवा करून निवृत्तीच्या वेळेस आयुष्याच्या उर्वरित दिवस हे आनंदात घालवण्यासाठी पुढील आरोग्याच्या उपचारांसाठी आपल्या कुटुंबातील मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वतःचा खर्च स्वतःला भागवता यावा म्हणून इतके वर्ष कष्टाने सेवा शासनाच्या आधीन राहून केले तरी या शेवटच्या उतार वयामध्ये शासकीय सेवेतून निवृत्त होताना हातामध्ये शेवटी एक रूपया देखील न घेता घरी परतावे लागले आहे. वास्तविक पाहता, माननीय महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रेबुनल कोर्ट मुंबई. (मॅट कोर्ट मुंबई) यांनी दिलेल्या दिनांक 6/5/1997 ते 29/11/2011 ते दिनांक 10/6/2015 च्या जजमेंट मध्ये, सेवा श्रेष्ठता नुसार विनाविलंब कायम करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना ही मा. मॅट कोर्ट मुंबई यांच्या आदेशाचा अवमान सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.
सद्य स्थितीत काही चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे मयत झालेले आहेत आणि काहीजण सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. म्हणून त्यांच्या कायदेशीर वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या करिता सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील हे त्रासलेले श्रमिक, कर्मचारी हे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली यावेळी आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी बदली कामगारांचे दुखणे शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी सांगितले की सिव्हिल हॉस्पिटल मधील सर्व श्रमिक,वंचित कामगारांची यादी आणि संबंधित कागदपत्रे घेऊन या, न्याय हक्कासाठी 'मी स्वतः लक्ष घालेन' असा शब्द यावेळी सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील सर्व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना दिला आहे. या प्रसंगी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, जिल्हा सदस्य परसराम कुदळे यांच्या सोबत सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील कर्मचारी रविंद्र श्रीवास्तव, मोहन गवळी, सुमन कामत,
किशोर कुरणे, राकेश कांबळे, दशरथ गायकवाड, मोहन आवळे, धर्मा कांबळे, राजू कांबळे, राजेंद्र आठवले, बापू वाघमारे, बबन वायदंडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰=
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰