yuva MAharashtra जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू



 

            सांगली, दि. 4 (जि. मा. का.) : विविध आंदोलनेआगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिंच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा सन 1951 च्या कलम  37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थल सीमा हद्दीत 17 जून 2025 पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

            

या आदेशानुसार शस्त्रेसोटेतलवारीभालेदंडेबंदुका, सुरेकाठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणेकोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणेदगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणेजमा करणे आणि तयार करणेव्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणेजाहीरपणे घोषणा करणेगाणी म्हणणेवाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणेफलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणेत्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

            हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधीअंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 3 जून 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू झाला असून तो दि. 17 जून 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहीलअसे आदेशात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰