सांगली : सामाजिक बांधिलकी जपत मसुचीवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे बांधकाम कामगारांच्या मुले वर अक्षयदीप आणि वधू राजक्ता यांचा विवाह श्रमिक कष्टकरी कामगारांनी स्व: खर्चातून मोठ्या धुमधडाक्यात पार पडला.
मसुचीवाडी तालुका वाळवा येथील येथील गरीब कुटुंबातील मुलाचा विवाह सोहळा श्रमिक कष्टकरी वर्गातील कामगारांनी संपन्न केला कै. शंकर चंद्र शिंदे हे वीट भट्टी कामगार होते. मुले लहान असताना त्यांचे निधन झाले व सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीवर पडली दोन मुली एक मुलगा असा परिवार दोन्ही मुलींचा विवाह आईने वीट भट्टीवर काम व शेतीवर रोजंदारी करून केला राहिला तो मुलगा अक्षयदीप याला उमलत्या वयात आपल्या परिस्थिती जाणीव झाली तो भाजीपाला विक्री / रिक्षा चालवणे/ नाष्टा सेंटर / आचारी काम असे उद्योग करू लागला धडपड असणारा अक्षयदीप सर्वांचा अण्णा डीजे झाला सर्वांशी हसतमुख बोलणे मित्रपरिवार जोडणे हा त्याचा स्वभाव याच अक्षयदीप चा विवाह कामथी तालुका कराड येथील नवनाथ शिंदे यांच्या भाजी राजक्ता हिच्याशी मसुचीवाडी येथे संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी बांधकाम कामगार आणि अष्टविनायक श्रमिक ग्रुप. नवस गणेशोत्सव मंडळ व त्याच्या मित्रपरिवाराने आर्थिक तरतूद करुन भोजन व्यवस्था भेटवस्तू तर अष्टविनायक श्रमिक ग्रुपने नव वधू-वरांच्या हाती डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान दिले व शिवरायाची प्रतिमा दिली अगदी गावातून वरात निघाली वराती मध्ये शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भीम गीत व मित्र परिवारांची आवडीची गाणी वाकुर्डे येथील मोतीराम बेंजो पार्टी ने सदाबहार गीतांचा वर्षाव केला पाहुणेमंडळी मित्रपरिवार कामगार वर्ग तर हातात भगवा घेऊन ऊसतोड कामगार यांनी दोनच राजे इथे जन्मले या गीतावर आपला ठेका धरला अशा पद्धतीने या गरीब कुटुंबातील युवकाचा विवाह संपन्न झाला याची चर्चा व मसूचीवडी पंचक्रोशीतीत होत आहे.
सर्व थरातून श्रमिक कष्टकरी कामगारांनी केलेल्या विधायक कामाबद्दल कौतुक होत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰