yuva MAharashtra मातृभाषेतून शिक्षणामुळे शब्दसंग्रह, ज्ञानसंपदेत वाढ - शाहीर पाटील

मातृभाषेतून शिक्षणामुळे शब्दसंग्रह, ज्ञानसंपदेत वाढ - शाहीर पाटील


जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

 



 

सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे. महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामीम्हाइंभट यांच्यापासून ते संत ज्ञानेश्वरसंत तुकाराम यांचे अध्यात्मिक साहित्य व ग्रंथरचना त्याची साक्ष देतात. आपली शब्दसंपदा आणि ज्ञानसंपदा वाढविण्यासाठी मातृभाषेचा सक्षम वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक शाहीर पाटील यांनी केले.





जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असूनआपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच दिनांक 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.  


जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहितेकवी प्रकाश वायदंडेज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे या प्रमुख वक्त्यांसह ग्रंथपालवाचक व साहित्यिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.



            "माझा मराठाचि बोलु कौतुकें" या विषयावर मार्गदर्शन करताना साहित्यिक शाहीर पाटील यांनी संत कार्याचा उल्लेख करत मराठी भाषेची थोरवी विषद केली. शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवून आनंददायी शिक्षण कसे देता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ करण्यासाठी प्रयोगशीलता कशी जोपासावीयाचे त्यांनी काव्यात्मक भाषा शैलीतून सुंदर वर्णन केले. दया पवार यांची 'धरणही कविता आणि प्रा. फ. मुं. शिंदे यांची 'आई ही कविता साभिनय सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.




मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते म्हणालेमराठी साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकरवि. वा. शिरवाडकरविं. दा. करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे असे चार साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यात वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांनी कथाकवितानाटककादंबरी असे बहुविध दर्जेदार लेखन करून मराठी भाषा समृद्ध व संपन्न केलीअशा या प्रतिभा संपन्न साहित्यिकास अभिवादन करण्याचा हा दिवस असल्याचे आवर्जून सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे म्हणालेकुसुमाग्रजांनी अनेक दर्जेदार कविताकथानाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या, त्यातून त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटते. वेडात दौडले वीर मराठे सातपृथ्वीचे प्रेमगीतकोलंबसाचे गर्वगीतगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकारअनंत आमुची ध्येयासक्ती’ अशा श्रेष्ठ कवितांची उदाहरणे देऊन वि. वा. शिरवाडकर हे आपल्या कवितांतून शब्दप्रभू असल्याचे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी कवी प्रकाश वायदंडे यांनी अभिजात मराठी कविता सादर करून मराठी भाषेचे श्रेष्ठत्व विषद केले.



            प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे म्हणालेकेंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. यामुळे मराठी भाषा व साहित्य यांचा प्रचार-प्रसार व संवर्धन करण्याच्या कार्याला मोठी गती प्राप्त होईल. विशेषत: तरुणांमध्ये मराठी भाषेविषयी जिज्ञासाकुतुहलआकर्षण व अभिमान वाढीस लागावा, या दृष्टीने नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात विकिपिडीयापासून ते एआय पर्यंत मराठी साहित्याची उपलब्ध करुन त्याविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढवावी लागेल.


            प्रारंभी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कवी प्रकाश वायदंडे आणि शाहीर पाटील यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.



            महात्मा गांधी ग्रंथालयाचे ग्रंथपाल दिगंबर सूर्यवंशी यांनी आभार मानले. मराठी भाषा व साहित्य यांचा प्रचार-प्रसार व संवर्धन व्हावे या हेतुने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेतील विविध ग्रंथसंपदाकुसुमाग्रजांचे साहित्यकोशवाड्मयविश्वकोशशब्दकोश इत्यादी साहित्यांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमास कार्यालयातील कर्मचारीग्रंथपालसाहित्यिक, वाचक व स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰