yuva MAharashtra वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीला यश... अखेर बांधकाम कामगारांचे हक्काचे पोर्टल सुरू .... संजय भूपाल कांबळे

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीला यश... अखेर बांधकाम कामगारांचे हक्काचे पोर्टल सुरू .... संजय भूपाल कांबळे


खाजगी कंपन्या पोसण्यासाठी सुरू केलेले तालुका सुविधा केंद्र बंद करण्यासाठी लढा कायम सुरू राहणार..



सांगली  दि. : ०५ : एंजट, नेट कॅफे व झेरॉक्स सेंटरवाले बांधकाम कामगारांची आर्थिक लूट थांबवावी म्हणून मंडळाच्या सचिवांनी तालुका सुविधा केंद्र या नावाने पांढरा हत्ती मंडळाच्या गळ्यात बांधला. नोंदणी नुतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्याची यंत्रणा नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटनांना द्यावे. तसेच मंडळाच्या तिजोरीतून दरमहा कोट्यवधी रुपयांची लूट ताबडतोब थांबवून खाजगी कंपन्यांना पोसण्यासाठी सुरू केलेले तालुका सुविधा केंद्र ताबडतोब बंद करावे. याचबरोबर तत्कालीन मंडळाचे अध्यक्ष आणि विद्यमान सचिव यांनी संगनमताने मंडळाच्या शिल्लक निधीची लूट केली आहे . त्या मनमानी पद्धतीने केलेल्या कारभारी तसेच त्यांच्या वर्षानुवर्ष वाढत चाललेल्या मालमत्तेचे 'ईडी' मार्फत चौकशी करावी यासाठी लढा देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कायम पुढे असेल.
सर्व कामगार संघटना आणि बांधकाम कामगारांच्या एक जुटीचा विजय झालेला आहे. परंतु लढाई अजून संपलेली नाही. श्रमिक कष्टकरी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्नांवर तसेच खच्चीकरण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापक लढा उभारण्यात येणार आहे. असे माहिती वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, जिल्हा संघटक सिध्दार्थ कोलप, सांमिकु मनपा अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, रूपये तामगावकर, विशाल कांबळे , संदिप कांबळे, सुभाष पाटील, जावेद आलासे, रियाज मुजावर, संजय चव्हाण, जयकर काळे, जयदीप जगदाळे, फरदीन नदाफ, चंद्रकांत कांबळे, विक्रांत गायकवाड यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰