yuva MAharashtra सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन



 

        सांगलीदि. 5 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता र्ज मागविण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्तसमाज कल्याणसांगली यांच्याकडे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावेतअसे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            महाराष्ट्र शासनसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक (व्यक्तीयांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतेसन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉबाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारशाहू फुले आंबेडकर पारितोषिकडॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जाचा नमुना सहायक आयुक्तसमाजकल्याणसांगली या कार्यालयात तसेच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहेअधिक माहितीसाठी पुरस्काराची सविस्तर जाहिरात दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजीच्या राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रामध्ये प्रसारीत करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰