yuva MAharashtra अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 17 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत




        सांगलीदि. 5 (जि. मा. का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पांतर्गत विविध महसुली गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची 39 मानधनी पदे रिक्त आहेत. ही मानधनी पदे भरण्यासाठी फक्त स्थानिक रहिवासी व गुणवत्ताधारक पात्र महिला उमेदवारांकडून ज्या-त्या स्थानिक गावातील रिक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 अखेर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मिरज कार्यालयात सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत साक्षांकित प्रतीसह समक्ष पोहोच करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीअसे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मिरजचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            एकाच गावातील एकापेक्षा जास्त रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांचे ठिकाण व केंद्रासाठी अर्जदाराने इच्छुक ठिकाणचा प्राधान्यक्रम द्यावयाचा आहेतथापि अंतिम निवड करण्याचे अधिकार हे निवड समितीकडे राखून ठेवण्यात आले आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता या बाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायतपंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे.

       

अटी व शर्ती - उमेदवाराचे वय दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी वय वर्षे 18 वर्षांच्या वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 17 फेब्रुवारी 2025 - 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवासी असावी. उमेदवाराने फक्त स्थानिक गावातीलच अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करणे बंधनकारक असून प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे. तसेच  एकापेक्षा जास्त अंगणवाडी केंद्र असतील तर पसंतीक्रम नमूद करणे आवश्यक आहे. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील.

            गावनिहाय अंगणवाडी सेविका रिक्त पद असलेल्या अंगणवाडीचे ठिकाण व केंद्र क्रमांक पुढीलप्रमाणे. लक्ष्मीवाडी - लक्ष्मीवाडी-16, शिपूर - शिपूर-179, ढवळी - ढवळी-134, खंडेराजुरी - गवळेवाडी-173, अंकली - अंकली-गांवभाग-136, जानराववाडी - जानराववाडी-67.

            

   गावनिहाय अंगणवाडी मदतनीस रिक्त पद असलेल्या अंगणवाडीचे ठिकाण व केंद्र क्रमांक पुढीलप्रमाणे. लक्ष्मीवाडी – लक्ष्मीवाडी-2, आरग – नुलकेचाबरे वस्ती-1, शिंदेवाडी - शिंदेवाडी-3, लिंगनूर - लिंगनूर-4, बेडग – कणसे वस्ती-6, नरवाड – कमलेकर वस्ती-5, नरवाड - बाराकोठरी-50, बेळंकी – गडदरे वस्ती-7, बेळंकी - बेळंकी-207, डोंगरवाडी - कदममळा-8, जानराववाडी - गावभाग-67, चाबुकस्वारवाडी - चाबुकस्वारवाडी-65, कदमवाडी - घाटगेमळा-9, पायाप्पाचीवाडी - नवीन वसाहत-10, शिपूर - नाईक चव्हाणवस्ती-11, भोसे - सुतारवस्ती-12, भोसे - शिंदेवस्ती-85, सोनी - जाधवमळा-13, वड्डी - वड्डी-52, वड्डी - वड्डी-23, मल्लेवाडी -मल्लेवाडी-14,   विजयनगर -  विजयनगर-55, इनामधामणी - इनामधामणी-142, म्हैसाळ - म्हैसाळ-16,  म्हैसाळ - म्हैसाळ-17, ढवळी - ढवळी-18, मालगांव - शेडबाळेवस्ती-19, मालगांव - पंचशीलनगर-161, मालगांव - मालगांव-149, मालगांव - दामुमाळीवस्ती-21, मालगाव - क्षिरसागरमळा-मालगांव-20, गुंडेवाडी - कोळेकरवस्ती गुंडेवाडी-22, खंडेराजुरी - खंडेराजुरी-168, खंडेराजुरी - खंडेराजुरी-172, टाकळी - टाकळी-सुभाषनगर-15, टाकळी - टाकळी-114, टाकळी - टाकळी-112, टाकळी - टाकळी-115, तानंग - सामानेनगर-186.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰