समर्थ संस्थेची व्यसनमुक्त व रोगमुक्त भारत कार्यशाळा संपन्न..
सांगोला : समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था,न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड व समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्यसनमुक्त व रोगमुक्त भारत अभियानांतर्गत कोल्हापूर येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी न्यूट्रीस्टार हेल्थ प्रो.प्रा.लिमिटेड चेअरमन प्रदीप कुंभार यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली.
सध्या समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व त्या अंतर्गत अनेक व्याधी लोकांच्या शरीराला जडत आहेत. सध्या भारतामध्ये 70 टक्के व्यसनाचे प्रमाण असून.व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यसन करीत असून सर्वाधिक व्यसनी लोकांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये झपाटाने वाढत चाललेला आजार म्हणजे मधुमेह आहे.
जगात भारत देश हा मधुमेह या आजाराची राजधानी बनलेला आहे. पूर्वी श्रीमंताच्या घरचा समजला जाणारा हा आजार सर्वसामान्य कुटुंबात कधी पोहोचला हे कुणालाही समजलं नाही. बदलती जीवनशैली,आहारामध्ये असमतोलता,शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर,वातावरणामध्ये असणारे प्रदूषण व पाण्यामध्ये मिसळणारे अनेक रासायनिक पदार्थ पर्यायाने अशुद्ध झालेली हवा या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे 'मधुमेह'. या आजाराने सध्या संपूर्ण देशाला ग्रासलेल आहे.
यासाठी न्यूट्रीस्टार कंपनीने समर्थ संस्था व समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 'व्यसनमुक्त,मधुमेह मुक्त व रोगमुक्त भारत'या अभियानाची सुरुवात केली असून या अभियानांतर्गत समाजामध्ये जनजागृती करून त्यांना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता करणारी उपचार पद्धती समजून सांगितली जाते व त्यांना त्यांच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
या अभियानांतर्गत आतापर्यंत हजारो नागरिकांना लाभ झाला असून सशक्त व सुदृढ भारत बनवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी आम्ही सर्वजण अहोरात्र कार्य करीत आहोत.
यावेळी या समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन अभियानाच्या पुढील वाटचालीची माहिती दिली.यावेळी न्यूट्री स्टार कंपनीचे प्रमुख सहकारी संदीप कुंभार,देवदास जाधव,भारत वरुटे,ज्योतीराम सुतार,कृष्णात डवंग,उत्तम पाटील,विनायक गुरव,संजय गुरव यांचे सह अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰