yuva MAharashtra भारती बझार पुणे शाखा भिलवडी आयोजित हळदी कुंकू समारंभासह खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न..

भारती बझार पुणे शाखा भिलवडी आयोजित हळदी कुंकू समारंभासह खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न..



भिलवडी (ता. पलूस ) : कृष्णाकाठावरील भिलवडी, अंकलखोप, औदुुंबर, माळवाडी येथील तुम्हा सर्व महिलांचा उत्साह या समारंभाची शोभा वाढवणारा आहे. तुमचे प्रेम खरंच वेगळं आहे. आणि खरंतर ते प्रेमच मला इथपर्यंत खेचून आणते, या कार्यक्रमाला आल्याने मला खूप आनंद होतो असे भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांनी सांगितले.

  भारती बझार पुणे शाखा भिलवडी (ता. पलूस) यांच्यावतीने हळदी कुंकू समारंभासह खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.


भारती बझारचे कार्यकारी संचालक जगन्नाथ शिंदे यांच्याहस्ते विजयमाला कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व महिला संचालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्हा परिषद मराठी शाळेत याचे आयोजन केले होते. गायत्री श्रीपाल चौगुले, आरती सचिन पेठारे, तेजस्विनी प्रशांत कांबळे या पैठणी साडीच्या विजेत्या ठरल्या.

विजयमाला कदम म्हणाल्या,
भिलवडी परिसरात नेहमीच चांगले कार्यक्रम होतात. हळदी-कुंकूचा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच आहे.


तुम्हाला भेटून मला अत्यानंद होतो, या कार्यक्रमात सहभागी होता येते.
या कार्यक्रमाची महिला खूप आतुरतेने वाट पाहत असतात. ते मी अनुभवले आहे. तेच प्रेम मला या ठिकाणी खेचून आणते. समोरचा उत्साह असाच टिकवून ठेवा. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असेच प्रेम करा. भविष्यात निरनिराळे उपक्रम राबवू. तुम्हा सर्व ग्रामस्थांना सहकार्य करू असे त्यांनी जाहीर केले.
पुढे त्या म्हणाल्या, मला तुम्ही सर्वजण 'आईसाहेब' म्हणून बोलवता, संवाद साधता. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याचे मला कौतुक आहे.
याच कार्यक्रमात भारती बझारच्या नवीन उत्पादनांचे सादरीकरण करण्यात आले. त्याची माहिती जगन्नाथ शिंदे यांनी दिली. 
सूत्रसंचालन करीम अत्तार, दीपक पाटील यांनी केले.
यावेळी कांचन कदम, खंडोबाचीवाडी सरपंच अश्विनी मदने, माळवाडी सरपंच सुरैय्या तांबोळी, भिलवडी सरपंच सीमा शेटे, अंकलखोप सरपंच राजेश्वरी सावंत, रोहिणी चौगुले, सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भिलवडी, माळवाडी, अंकलखोप परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विविध खेळ, उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या.

 

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰