सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 25 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता मिरज येथे आगमन व श्री. शंकर आण्णा इसापुरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – ब्रम्हचैतन्य बंगला, मिरज कुपवाड रोड, पोवार पेट्रोल पंपासमोर, विस्पर वुड कॉलनी मिरज. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून पोलीस परेड मैदान, विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण, सकाळी 9.10 वाजता आगमन व 76 व्या प्रजासत्ताक दिन समारंभास उपस्थिती, स्थळ – पोलीस परेड मैदान, विश्रामबाग, सांगली. सकाळी 10.30 वाजता आगमन व आयुष सेवाभावी संस्था कार्यालय उद्घाटनास उपस्थिती, स्थळ – डॉ. जे. व्ही. शेट्टी यांच्या रूग्णालयाजवळ, कुपवाड. सकाळी 11 वाजता आगमन व सौ. स्मिता समीर पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ - प्रमिला निवास, रेव्हेन्यु कॉलनी, चांदणी चौक शेजारी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली, सकाळी 11.30 वाजता श्री. गणपती मंदीर, सांगली येथे आगमन व दर्शनासाठी राखीव, स्थळ – गणपती पेठ, सांगली, दुपारी 12 वाजता आगमन व उमेद आयोजित मिनी सरस (विक्री व प्रदर्शन), सन 2024-25 प्रदर्शनास सदिच्छा भेट, स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, कॉग्रेस भवन जवळ, सांगली, दुपारी 12.30 आगमन व श्री. संजय भोकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ –सिद्धार्थ बंगला, हॉटेल पर्ल च्या शेजारी, विजयनगर, सांगली. दुपारी 1 वाजता आगमन व श्री. सुधीर चापोरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – न्यु विजय कॉलनी, विश्रामबाग, सांगली. दुपारी 1.30 वाजता आगमन व श्री. समित कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – कदम बंगला, शिवाजीनगर, मिरज. सोयीनुसार कोल्हापूरकडे प्रयाण.